शेकडो विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी व जनजागृती

सिकलसेल सप्ताह निमीत्य सिकलसेल रूग्णांची आरोग्य तपासणी

मूल : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपजिल्हा रूग्णालय मूलच्या वतिने सिकलसेल सप्ताह मूल तालुक्यात राबविण्यात आला. सदर सप्ताहामध्ये शेकडो विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी व सिकलसेल रूग्णाची आरोग्य करण्यात आली.
सप्ताहानिमीत्य उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्वल इंदुरकर, शालेय तपासणी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता मेश्राम, तालुका समुह संघटक पल्लवी बुरांडे, प्रयोगशाळा तत्रज्ञ अश्विनी येमबरवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सिकलसेल तपासणी केली.
सिकलसेल याआजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मूल शहरात रॅली काढुन गरोदर माताची सिकलसेल तपासणी, सिकलसेल रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, मूल तालुक्यातील मारोडा येथिल विश्वशांती विद्यालयामध्ये 250 विद्यार्थ्यांची व मूल येथील बल्लारपूर पब्लीक स्कुल मधील इयत्ता 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्यासोबतच मूल तालुक्यातील भगवापूर येथील नागरीकांची सिकलसेल तपासणी व सिकलसेल आजारावर जनजागृती करण्यात आली. सिकलसेल सप्ताहाचे संपुर्ण नियोजन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रयोगशाळा तत्रज्ञ अश्विनी येमबरबार यांनी केले.