पोष्टर स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था द्वारा पोस्टर स्पर्ध्येचे आयोजन

मूल : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व संकल्प बहुउध्येशिय ग्राम विकास संस्था संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली 16 डिसेंबर रोजी मूल तालुक्यातील आकापूर येथील देवनील स्कूल ऑफ नर्सिंग येथे पोस्टर स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवनील स्कूल ऑफ नर्सिंगचे संस्थापक, माजी आमदार देवराव भांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून टी. एस. यु.चे कार्यक्रम अधिकारी गणेश पराते, उपजिल्हा रूग्णालय मूल येथील आयसीटीसीच्या समुपदेशक मीना नंदनवार, लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार, देवनील स्कूल ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या भावना टेकाम, लिंक वर्कर प्रशांत कवाडे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात पार पडलेल्या विविध स्पर्धा कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती लिंक वर्कर प्रकल्पाचे डी आर पी रोशन आकुलवार यांनी दिली. यावेळी देवनील स्कूल ऑफ नर्सिंग येथील विध्यार्थीनी एचआयव्ही/एड्स विषयावर काढलेल्या पोस्टरची प्रशंसा केली. पोस्टर स्पर्धेत 60 विध्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. प्रथम क्रमांक दिव्या संतोष रॉय, द्वितीय अमन भास्कर बामनकर तर तृतीय क्रमांक वैष्णवी मनोज ठाकरे या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन लिंक वर्कर प्रकल्पाचे डी आर पी रोशन आकुलवार यांनी केले.