पोंभुर्णा नगर पंचायतच्या निवडणुकीत कुठे दुहेरी तर कुठे तिरंगी लढत

आ. मुनगंटीवारांनी केलेल्या विकासकामावर नागरीक खुष


  पोंभुर्णा (प्रतिनिधी)

21 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या पोंभुर्णा नगर पंचायतच्या निवडणुक प्रचाराला चांगलीस रंगत आली असुन महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षासह भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि भुमिपुत्र ब्रिगेड या संघटनेनेही या निवडणुकीत उडी घेतलेली आहे, मात्र याठिकाणी बहुतांष जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्येच चांगली टक्कर होत असल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी भाजप-शिवसेना-कॉंग्रेस अशी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भुमिपुत्र ब्रिगेड यासंघटनेच्या उमेदवारही आपले नशिब अजामावित आहे मात्र येणारा काळच सांगेल कोणाच्या गळयात विजयाची माळ पडेल.
पोंभुर्णा नगर पंचायतच्या 17 जागेपैकी इतर मागासप्रवर्गाच्या 4 जागेसाठी 18 जानेवारी रोजी निवडणुक होणार आहे, यामुळे 13 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपाने 13, कॉंग्रेस 13, शिवसेना 12 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे केलेले आहे. यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भुमिपुत्र बिग्रेडनेही यानिवडणुकीत आपआपले उमेदवार निवडणुक रिंगणात उभे केले आहे.
पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामाची चांगलीस चर्चा आहे, शहरात उभारण्यात आलेल्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची प्रतिकृती असलेल्या नगर पंचायतची आकर्षक इमारत नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहे. भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी इको पार्क, मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण, पथदिवे यासरखे विविध विकास कामे करण्यात आली यामुळेच भाजपाने विकासाचे मुद्दे पुढे करून प्रचार करीत आहे, शिवसेनेनी शहराचा नियोजनबध्द विकास करण्याचे ध्येय पुढे ठेवून प्रामुख्याने रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य याबाबतीत पोंभुर्णा एक आदर्शवत शहर बनविण्याचा निर्धार व्यक्त करीत मतदारांपुढे जात आहेत, शिवसेनेनी चांगले तगडे उमेंदवार यानिवडणुकीत उभे केले आहे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे पोंभुर्णा येथे ठाण मांडुन बसले आहेत. कॉंग्रेसने निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा म्हणत 13 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे केले आहे. भुमिपुत्र बिग्रेडनी 5 उमेदवार, राष्ट्रवादी कॉग्रेस, बंचित बहुजन आघाडीनेही यानिवडणुकीत उमेदवार उभे करून सर्वच पक्षाच्या उमेदवारांना आव्हान दिले आहे. मात्र होवु घातलेल्या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपा-शिवसेना, काही ठिकाणी भाजपा-कॉंग्रेस तर काही ठिकाणी भाजपा-शिवसेना-कॉग्रेस आणि एका ठिकाणी सेना-वंचीत अशीच टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे.