सावली च्या प्रचार सभेत आमदार सुधीर मुनगंटीवार कडाडले

आम्ही बोलतो ते करतोच, एकदा सत्ता द्या कायापालट करून दाखवू

सावली : आम्ही जे आश्वासन देतो, निवडणूक प्रचार सभा मध्ये जे बोलतो ते करून दाखवतो, फक्त निवडणुकीत आश्वासन द्यायला येत नाही तर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी जीवाचे रान करतो अशे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले, ते सावली नगर पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रचार सभेत बोलत होते,

गुजरी चौकातील नगर पंचायतीच्या क्रीडांगणावर झालेल्या या सभेत खासदार अशोक भाऊ नेते, आमदार बंटी भाऊ भांगडीया, माजी आमदार अतुल भाऊ देशकर, संजय गजपुरे, मुल नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सुहास अलमस्त तसेच नगर पंचायत साठी उभे असलेले भाजप चे सर्व उमेदवार तसेच स्थानिक नेते उपस्थित होते,

प्रसंगी सुधीर भाऊ यांनी उपस्थित जनतेला पाणी, वीज , रस्ते , नाल्या या मूलभूत सुविधा त्याचप्रमाणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याणसाठी अभ्यासिका, वाचनालय अश्या विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी जीवाचे रान करेल, मी अर्थमंत्री होतो राज्याच्या तिजोरीच्या चाब्या कुठे असतात, त्याची चाबी कशी खुलते याची मला संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमच्या सावलीला मुल, पोंभुरणा सारख बनवून दाखवेल असे प्रतिपादन करत एकदा सत्ता देण्याचे आवाहन केले, त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र शासनावर सडकून टीका करत हे तीन तिघाडी बिघाडीच सरकार आहे यांना दारूवर 50 टक्के सुबसिडी देता येते पण शेतकऱयांना मदत करता येत नाही, परीक्षांमध्ये घोटाळे, प्रत्येक जागी घोटाळे करत हे घोटाळ्याचे सरकार म्हणून पुढे येत आहे, अशे प्रतिपादन केले,

आमदार बंटी भागडीया यांनी स्थानिक आमदारांवर टीका करत यांना विकास कामांसाठी काहीही देणं घेणं नाही फक्त दारूच्या विषयांवर ते काम करत असल्याचे बोलले, त्यांनी या पूर्वीच्या नगर पंचायत च्या सत्तेत काय दिवे लावले आहेत यावरही प्रश्न उपस्थित केले,   खासदार अशोक नेते यांनी सावली शहराच्या मध्य भागातून गेला नॅशनल हाय वे हा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातून झाल्याची आठवण करून दिली, माजी आमदार अतुल देशकर यांची पण भाषण झाले, प्रसंगी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता,