ग्राम स्वच्छता अभियानात कोसंबी ग्राम पंचायत प्रथम

मूल: पंचायत समिती मूलच्या वतिने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात नुकताच पार पडला यावेळी जिल्हा परिषद क्षेत्रातुन कोसंबी ग्राम पंचायतला प्रथम क्रमाकाचे पुरस्कार वितरण करण्यात आले-
मूल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बक्षिस वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी मूल पंचायत समितीच्या सदस्या वर्षा लोनबले होते- प्रमुख अतिथी म्हणुन गट विकास अधिकारी सुनिल कारडवार, विस्तार अधिकारी (पंचायत) जिवन प्रधान, आरोग्य विस्तार अधिकारी वैध, कृषी विस्तार अधिकारी नरेंद्र पेटकर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत मारोडा-राजोली जिल्हा परिषद क्षेत्रातील कोसंबी ग्राम पंचायतने प्रथम क्रमांक पटकावीला आहे. यावेळी स्पर्धेचे बक्षिस मूल पंचायत समितीच्या सदस्या वर्षा लोनबले यांच्या हस्ते ग्राम पंचायतचे सरपंच रविंद्र कामडी, सचिव सुरज आकनपल्लीवार यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन स्वच्छ भारत मिशनचे हर्षवर्धन गजभिये यांनी केले, उपस्थितांचे आभार सचिन येरमलवार यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच, सचिव उपस्थित होते.