विवाहापुर्वी रक्ताची तपासणी करणे आवश्यक: डॉ. अनिता मेश्राम

देवनिल स्कुल ऑफ नर्सींग मध्ये सिंकलसेल तपासणी शिबीर
मूल : आई वडिलांकडुन मुलांना नकळत दिला जाणारा हा आजार आहे, सिकलसेल वाहक आणि सिकलसेल पिडीत अशा दोन प्रकारात हा आजार आहे सिकलसेल वाहकाला रक्तात 50 टक्के सिकल कोषिका असून 50 टक्के नॉर्मल कोषिका असतात, त्यामुळे तो सामान्य व्यक्तीसारखा जिवन जगु शकतो, परंतु वाहक इसमाला कोणताही त्रास होत नसल्याने सिकलसेलची तपासणी करण्याकडे त्यांच दुर्लक्ष होत, सिकलसेल वाहकाशी विवाह केल्यास होणारी संतती ही सिकलसेल पिडीत होण्याची शक्यता असते म्हणुन विवाहापुर्वी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे असे मत उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता मेश्राम यांनी व्यक्त केले. त्या आकापूर येथिल देवनिल स्कुल ऑफ नर्सींग येथील विद्यार्थींनीची सिकलसेल तपासणी शिबीराप्रसंगी बोलत होत्या.
सप्ताहानिमीत्य आयोजीत कार्यकमाला उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता मेश्राम, प्रयोगशाळा तत्रज्ञ अश्विनी येमबरवार, देवनिल स्कुल ऑफ नर्सिंग आकापूरच्या प्राचार्य भावना टेकाम, प्रयोगशाळा तत्रज्ञ नेगल टिंगुसले उपस्थित होते.
उपजिल्हा रूग्णालय मूलच्या वतिने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल सप्ताहानिमीत्याने मूल तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी व नागरीकांची सिकलसेल तपासणी, व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे संचालन यशोदा कुमारे यांनी केले उपस्थितांचे आभार पुजा सावसाकडे हिने मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.