सावलीत कॉंग्रेस-भाजपात खरी लढत

वार्ड क्रं 9 आणि 14 मध्ये काटे की टक्कर
सावली : 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या सावली नगर पंचायतच्या 14 जागेसाठी शांततेत निवडणुक पार पडली. कोणतीही अनुसुचित घटना घडु नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
सावली नगर पंचायतीच्या 14 जागेसाठी निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. या 14 जागेकरिता काँग्रेस, भाजप, बसपा, वंचित, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आपआपल्या परीने उमेदवार उभे केले होते. परंतु खरी लढत काँग्रेस आणि भाजप मध्येच होणार असल्याचे दिसून येत आहे. सावली नगर पंचायतच्या वार्ड क्रं. 9 आणि 14 मध्ये भाजपा आणि कॉंग्रेसने एकमेकांविरोधत तगडे उमेदवार दिल्याने याठिकाणची लढत ही काटे की टक्कर म्हणुन मतदारनाी अनुभवली आहे. मतदार कोणत्या उमेदवारास पसंती देतात याबाबत 19 जानेवारीला माहिती होईल तो मतदारही अंदाज व्यक्त करण्यात व्यस्त दिसुन येत आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपा चे उमेदवार सध्यातरी चिंताग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. सावली नगर पंचायतच्या 3 वार्डाची निवडणूक 18 जानेवारी रोजी होणार असून 19 जानेवारीला मतमोजणी होणार असून कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी होतात यावर जनतेचे लक्ष लागले आहे