मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू आहे. विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता विधानभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलण्यात येत आहेत. लोकशाहीतील अनेक प्रथा हे सरकार मोडीत काढत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मुळात बारा आमदार निलंबित असताना अध्यक्षपदाची निवडणूक सरकार घेऊ शकत नाही, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.गेल्या हिवाळी अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना सभागृहातून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.या अधिवेशनात हे निलंबन मागे घेण्याची अपेक्षा होती. मात्र,अधिवेशन सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्यावतीने निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत कोणताही कार्यवाही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी सांगितले