चंद्रपूर : सावित्रीबाई फुले महिला मंडळ व भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने नगीनाबाग सवारी बंगला परिसरात रक्तदान शिबिर पार पडले या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. त्यानंतर दोनशेच्यावर गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले.
चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बाल रोग तज्ञ डॉक्टर अभिलाषा गावतूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सवारी बंगला परिसरात त्यांचा पुस्तक तुला करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औष्णीक केंद्र ऊर्जानगर चे मुख्य अभियंता सोनकर सपाटे, पुरुषोत्तम सातपुते, डॉक्टर राजू दली उपस्थित होते. कोणताही कार्यक्रम स्वतः पुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याची प्रथा गावतूरे कुटुंबियांनी या कार्यक्रमातून दाखवून दिले.
यावेळी दोनशेच्यावर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील भूमिपुत्र ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते, संचालन विजय मुसळे यांनी केले.