राज्यात पाच महिन्यात 1076 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : या कृषिप्रधान देशात शेतकरी नेहमीच वंचित, उपेक्षित राहिला आहे. राज्यात जून ते  ऑक्टोबर 2021 या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल 1076 शेतकयांनी आत्महत्या केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली आहे.

आर्थिक मदत आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी हे उत्तर दिले. विधीमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले. शेतकरी आत्महत्यांविषयी धक्कादायक माहिती आज अधिवेशनात सादर करण्यात आली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.