बढतीच्या आदेशाने कार्यालय झाले खाली

अभियंता अभावी कामे खोळंबण्याची शक्यता?
✍️ मंगेश पोटवार, मूल
दरवर्षी करोडा रूपयांची बांधकाम करून देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बहुतांष सहा. अभियंता श्रेणी 2 पदावर काम करणाऱ्या अभियंताची बढती झाल्याने मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय खाली झाले आहे, यामुळे शाखा अभियंत्याअभावी मूल तालुक्यातील विकास कामे खोळंबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्यात करोडो रूपयाची निधी आणुन तालुक्याचा न भुतो न भविष्यती असा विकास केलेला आहे, नेहमीच सिंचनाची समस्या घेवुन ओरडणाऱ्यांना आमदार मुनगंटीवार यांनी यांचे तोंड गप्प करीत चिरोली येथे पायलट बंधारा, मारोडा येथे हॉस्माक बंधारा उभारण्यासाठी भरमसाठ निधी उपलब्ध करून दिले, सध्यास्थितीत याबंधाऱ्यामध्ये मोठया प्रमाणावर पाणी आहे. यासोबच तालुक्यात सिंचन क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने अनेक बंधाऱ्याचे कामेही पुर्ण करण्यात आलेले आहे. सदर कामे मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अभियंता श्रेणी 2 चे अभियंता रूपेश बोधडे, अभियंता प्रमोद धांडे अभियंता किरण पोकडे आणि अभियंता अनंत खोडे, अभियंता सुनिल राठोड, शाखा अभियंता दुशांत साखरे यांनी पुर्ण केले. मात्र काही दिवसांपुर्वी शासनाने सहा. अभियंता श्रेणी 2 पदावर कार्यरत असलेल्या अभियंताची, उपविभागीय अभियंता म्हणुन बढती केलेली आहे. मूल येथील सहा. अभियंता श्रेणी 2 पदावर कार्यरत असलेले रूपेश बोधडे यांची नागपूर जिल्हयातील कळमेश्वर, इंजि. प्रमोद धांडे यांची यवतमाळ जिल्हयातील घाटंजी, इंजि. अनंत खोडे यांची वाशिम जिल्हयातील मानोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उपविभागीय अभियंता म्हणुन शासनाने बढती केलेली आहे. तर सहा. अभियंता श्रेणी 2 पदावर कार्यरत असलेले इंजि. किरण पोकडे यांची उपअधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली या पदावर बढती करण्यात आलेली आहे. मूल सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजि. पोकळे यांनी फक्त कार्यालय सोडलेले नाही, उर्वरीत तिन्ही अभियंत्यानी मूलचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय सोडले असून बढतीच्या ठिकाणी रूजु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, शाखा अभियंता दुशांत साखरे आणि सहा. अभियंता श्रेणी 2 सुनिल राठोड कार्यरत आहे.