मामा तलावाच्या गेटचे काम पुर्ण होण्याआधीच गळती सुरू

पाटबंधारे विभागाच्या कामाचे तिनतेरा : कारवाई करण्याची मंगेश पोटवार यांची मागणी
मूल (प्रतिनिधी)  : तालुक्यातील जानाळा येथील मामा तलावाचे काम मागील अनेक दिवसांपासुन सुरू असुन काम अंतिम टप्यात आहे. मात्र गेट मधुन मोठया प्रमाणावर पाणी गळती सुरू असल्याने झालेले काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असुन सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केली आहे.

मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील मामा तलावाला लागुन जंगलव्यप्त परिसर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे जानाळा परिसरातील हजारो हेक्टर शेतामधुन शेतकरी पिक घेतात, परंतु मागील काही वर्षापासुन तलावाच्या गेट मधुन मोठया प्रमाणावर पाणी गळती होत होती, यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात होते, पाटबंधारे विभागाने सदर गेटच्या दुरूस्तीचे काम मजुर संस्थेला करण्यासाठी निवीदा काढली, सदर काम ब्रम्हपूरी येथील एका मजुर संस्थेनी घेवुन कामाला सुरूवात केले. सध्यास्थितीत काम अंतीम टप्यात आहे, मात्र जुना गेट मधुन पाणी गळती होत होती त्यापेक्षाही नविन बाधकाम करण्यात आलेल्या गेट मधुन मोठया प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे, यावरून सदर काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप पोटवार यांनी केला आहे

सदर संस्थेच्या माध्यमातुन अस्तरीकरणाचेही काम करण्यात आले असुन अस्तरीकरणाचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाल्याने आताच जागोजागी पाणी गळत आहे, त्यासोबतच नहराच्या रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूमही अतिशय कमी असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केला असुन सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या  मजुर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील, जिल्हयाचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांचे कडे करण्यात आली आहे.

गेटचे काम निकृष्ट दर्जाचे : तुळशीराम कुंभारे पाण्याची गळती होत असल्याने पाटबंधारे विभागानी मजुर संस्थेच्या माध्यमातुन तलावाच्या गेटचे कामाला सुरूवात करण्यात आले, सदर काम करीत असताना पाणी वापर संस्थेला कोणतीही माहिती दिली नसुन मजूर संस्थेने आपल्याच मर्जीने काम केलेले आहे, सदर गेट मधुन मोठया प्रमाणावर पाणी गळती होत असुन काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप जलविकास पाणी वापर संस्था जानाळाचे अध्यक्ष तुळशिराम कुंभारे यांनी केले.