49 ग्राम पंचायतचा कारभार 28 सचिवांवर

अनेक पदावर प्रभारी अधिकारी

              ✍️ नुतन गोवर्धन, मूल                                                            ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वाचा दुवा हा ग्राम पंचायतचा सचिव असतो, मात्र मूल तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतचे सचिव हे प्रभारी सचिव म्हणुन कार्यरत आहेत, तालुक्यात 49 ग्राम पंचायत आहे परंतु सचिव मात्र 28 असल्याने अनेक सचिवांकडे 2  ग्राम पंचायचा पदभार आहे. यामुळे सचिवांना ग्राम पंचायत मध्ये काम करण्यासाठी पुरेशा वेळ देणे शक्य होत नाही, प्रभारी सचिवामुळे नागरीकांचेही काम वेळेवर होत नसल्याची खंत नागरीक व्यक्त करीत आहे.

मूल तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्र 3 तर पंचायत समिती क्षेत्र 6 आहेत, भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता असुन त्यानुसार प्रशासनाकडुन आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू आहे. मूल तालुक्यात ग्राम पंचायत निहाय लोकसंख्या 89926 आहे आहे, तालुक्यात 110 गावे असुन 49 ग्राम पंचायत आहे. यातील अनेक ग्राम पंचायत हे गट ग्राम पंचायत आहेत, असे असतानाही केवळ 28 ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तालुक्यात कार्यरत आहे, यामुळे मूल तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतमध्ये सचिवाचे पद रिक्त आहे, एकाच ग्रामसेवकाला दोन ग्राम पंचायतीचा प्रभार दयावा लागत आहे. दरम्यान ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचेकडुन एका ग्राम पंचायतमध्ये काम करण्यासाठी पुरेषा वेळ देणे शक्य होत नाही, यामुळे गावातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मूल येथील पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी उच्च श्रेणी, तालुका कृषी अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पदही प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. यामुळे मुल तालुक्यातील अनेक अधिकारी हे प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील तिन ग्रामविकास अधिकारी निलंबीत
मूल तालुक्यातील नादगांव, येरगांव आणि बेंबाळ येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना वेगवेगळया कारणामुळे निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे सदर गावातील ग्राम पंचायतचा प्रभार ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचेकडे देण्यात आलेला आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here