सहकार बोर्डात विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण संपन्न

चंद्र्पूर : चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित चंद्रपूर च्या वतीने सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सहकारी पत संस्थेतील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाला.

तिन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्डाचे संचालक सिद्धार्थ पाथोडे यांच्या हस्ते करण्यात आले., प्रशिक्षण शिबीराच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते होते, प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे,ऍड प्रशांत शिर्के, नागपूर, के टी देवगडे उपप्राचार्य,बी सी फलके,सहकार प्रशिक्षण अधिकारी एन डी पिंपळकर होते.

दिपप्रज्वलन करून प्रमुख उपस्थितांच्या साक्षीने उदघाटन करण्यात आले. वाढती वसुली आणि वाढते एन पी ए चे प्रमाण कशे करण्यात येईल या संबंधित मार्गदर्शन करण्यात आले, प्रसंगी जिल्ह्यातील नागरी व पगारदार पत संस्थेचे कर्मचारी, अधिकारी आणि संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, समारंभाचे संचालन सहकार प्रशिक्षण अधिकारी एन डी पिंपळकर यांनी केले तर एस बी नागमोते , डी के झाडे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले