कॉंग्रेस नेत्याला भाजपा कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
मूल (प्रतिनिधी)
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा आहे, यासाठी कशाचाही भेदभाव केल्या जात नाही मात्र मूल तालुक्यातील कॉंग्रेसचे नेते हसन वाढई यांच्या वाढदिवसानितीत्याने अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावुन त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामुळे भविष्यात होवु घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मूल तालुक्यातील खालवसपेठ येथील ग्राम पंचायतचे माजी सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन वाढई यांचा 1 जानेवारी रोजी नविन वर्षाला वाढदिवस असतो, त्यांच्या वाढदिवस हा नेहमी प्रमाणे कुटुंबातिल व्यक्तीसोबत साध्यापणाणे साजरा करीत असतो, मात्र यावर्षी त्यांनी महापुरूषांचे विचार घराघरपर्यंत पोहचविण्यासाठी अतिशय ग्रामीण खेडे म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या फुलझरी, आगडी यासह चिरोली, कांतापेठ, केळझर येथील विद्यार्थ्यांना क्रांतिसुर्य ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहु महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या जिवनचरित्रावरील सुमारे 400 पुस्तके व गरीब व होतकरू नागरीकांना सुमारे 500 ब्लॅकेटचे वितरण केले.
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन वाढई हे जिल्हयाचे पालकमत्री नामदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत यांचे अत्यंत विश्वासु मानले जाते.. श्री. वाढई यांनी अनेक गोरगरीबांना मदत केलेली आहे, यामुळेच ते तालुक्यातच नव्हे तर जिल्हयातही त्यांच्याबद्दल आदर आहे. यामुळेच मूल तालुक्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्याने शुभेच्छा संदेश देणारे फलक लावुन त्यांच्या बदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यासह सोशल मिडीयावरही त्यांच्या अनेकांनी शुभेच्छा देवुन भविष्यात राजकारणात सक्रिय राहुन मोठया पदावर काम करन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
श्री. वाढई यांचे अलिकडील भाजप कार्यकर्त्या ंसोबत वाढलेली जवळीकता येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय रंगत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे विशेष.