चालबर्डी (कोंढा ) परिसरात वाघिणीचा मृतदेह आढळला

कुजलेल्या अवस्थेत मिळायला मृतदेह
जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
अतुल कोल्हे (भद्रावती) :
तालुक्यातील चालबर्डी कोंढा शिव रस्त्यालगत वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे दरम्यान उघडकीस आली.

या मृत वाघिणीचे वय अंदाजे ४ वर्ष असून शरीर कुजले असल्याने तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असल्याचे समजते. तसेच या परिसरात वाघिणीचे मृत शरीर शेत शिवारात लागत टाकण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी एचपी शेंडे यांनी वर्तविला आहे. वाघीणीचा मृत्यू कशाने झाला याचा शोध वन विभाग घेत आहे .