मूल (प्रतिनिधी)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्याने मूल तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतिने मूल येथील वार्ड क्रं. 16 मधील गरजु नागरीकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचेे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, शहराध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, प्रभाकर धोटे, हेमंत सुपणार उपस्थित होते
क्रांतीज्येाती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्लापण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मूल येथील वार्ड नं. 16 मधील झोपडपट्टी वसाहतीमधील शेकडो गोरगरीब नागरीकाना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले. उपस्थ्तिांचे आभार संजय मोहूर्ले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी सुरेंद्र बावनकर, प्रदीप देशमुख, परचाके यांनी अथक परिश्रम घेतले.