कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला केले जागीच ठार

भंगाराम तळोधी येथिल चित्तथरारक घटना, गोंडपिपरी आणि मूल तालुका हादरला

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली असून आपली जीवनसंगिनी, सात जन्माची साथीदार पत्नीला रागाच्या भरात कुऱ्हाडीने सपासप वार करून जागीच ठार मारल्याची मोठी घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण गोंडपीपरी तालुका आणि परिसर हादरला आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला.वादानंतर पतीने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुऱ्हाडीने गळ्यावर सपासप वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने कीटकनाशक औषधी प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.आरोपी राजू बावणे वय अंदाजे (४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मृतक योगिता राजू बावणे वय(३५) यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गोंडपीपरी येथे पाठविले आहे.अद्यापही हत्येचे कारण गुलदस्त्यात असून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

मृतक योगिता बावणे यांचे  मूल तालुक्यातील गाडीसुर्ला येथील माहेर असल्याचे कळते.