शेतीचे सर्व्हे करून तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्या : राहुल संतोषवार

पोंभुर्णा (प्रतिनिधी) :  गेल्या 2 दिवसापुर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे, यामुळे शेतीचे सर्व्हे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदचे सदस्य राहुल संतोषवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यात मोठया प्रमाणावर रब्बी पिके घेणारे शेतकरी आहेत, याहंगामात शेतकरी  तुर, चना, मिरची, कापूस व इतरही पिके घेत आहेत, परंतु शनिवार, रविवार आणि सोमवारी पोंभुर्णा तालुक्यात गारासह मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेली आहे, मागील महिण्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उभे धान पिक पाण्यात राहुन खराब झाले, त्याची नुकसान भरपाई अजुन मिळाली नाही आणि परत आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

शासनाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचे सर्व्हे करून तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदचे सदस्य राहुल संतोषवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली आहे.