बिडीओच्या निरोप समारंभात कोरोना नियमाचा फज्जा

मूल : मूल येथील संवर्ग विकास अधिकारी डॉ. मयुर कळसे यांची तहसीलदार पदी निवड झाल्यामुळे मूल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतिने मूल जवळील एका धाब्यावर शुक्रवारी दुपारी 1 वाजता दरम्यान निरोप संमारंभ कार्यक्रम आयोजीत केलेला होता, सदर कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमाचा फज्जा उडवीत कार्यकम साजरा केल्याने मूल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शासनाने नुकताच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नविन नियमावली लागु केली आहे, यानियमाचा नागरीक स्वतःहुन पालन करीत आहेत, मात्र मूल येथील संवर्ग विकास अधिकारी डॉ. मयुर कळसे यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात आयोजकानी सामाजिक अंतर ठेवुन राहण्याकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे, उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर मास्क सुध्दा दिसून येत नव्हता, यामुळे कर्मचाऱ्याना कोरोना नियम पाळण्याचे बंधन नाही काय असा संतप्त सवाल आता नागरीक करू लागले आहे,

मूल तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्यात झपाटयाने वाढ होत असताना ग्रामसेवक संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना नियमाचे उल्लघन करण्यामागे काय उद्देश होता हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

शासनाच्या कोरोना नियमावलीनुसार हॉटेलच्या 50 टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवणे आवश्यक आहे मात्र ग्रामसेवक संघटनेने आयोजीत केलेला कार्यक्रमाच्या ठिकाणी तोही नियम धुळकाविला आहे, एका बंद सभागृहात सदर कार्यक्रम घेवून ग्रामसेवक संघटनेने कोरोना नियमाचे तिनतेरा वाजविल्याने शासन सदर कार्यक्रम आयोजकांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                                                                                                 कोरोना नियमाचे पालन केले : विजय यारेवार
आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवण्यात आलेले होते, कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आल्याची प्रतिक्रिया ग्रामसेवक युनियन तालुका शाखा मूलचे विजय यारेवार यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.