रस्ता दुभाजक भेदून ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक ; 2 ठार 15 जखमी

ट्रक ट्रॅव्हल्स चालकांचा दोघांचा अपघातात मृत्यू
 वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील घटना

चंद्रपूर : नागपूर कडून चंद्रपूरकडे भरधाव वेगात जात असलेल्या  ट्रॅव्हल्सने रस्ता दुभाजक भेदून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स व ट्रक दोन्ही  चालकांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून ट्रॅव्हल्स मधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (14 जानेवारी 2022) ला रात्रौ साडेसातच्या सुमारास घडला. जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मृतांमध्ये ट्रक चालक अमोल भुजाडे ( वय 40 ) रा. चिखलगाव (वणी), ट्रॅव्हल्स चालक शब्बीर ( वय 40) रा. जलनगर चंद्रपुर यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये 15 प्रवाशांचा समावेश आहे.

घटनेची हकीकत अशी की, एम एच 34 बि जी 9540 क्रमांकाचा ट्रक  हा  चंद्रपूर येथून नागपूरला जाण्याकरता निघाला होता.  तर  एम एच 40 ए टी 401 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून चंद्रपूरला जाण्यासाठी निघाली होती. आज शुक्रवारी साडेसात वाजताच्या दरम्यान चंद्रपूर नागपूर मार्गावरील वरोरा शहरातील रत्नमला चौकात भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सने रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला भेदून दुसऱ्या बाजूच्या (विरूद्ध) रस्त्याने नाइपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की घटनास्थळीच ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्स मधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सदर अपघात घडल्यानंतर परिसरात असलेले नागरिक धावून आले आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. सर्वप्रथम जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले.   त्यानंतर 6 गंभीर जखमींना नागपूर तर उर्वरित 9 जणांना चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.  मृतांमध्ये ट्रक चालक अमोल भुजाडे ( वय 40 ) रा. चिखलगाव (वणी), ट्रॅव्हल्स चालक शब्बीर ( वय 40)से जलनगर चंद्रपुर यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रवीण घाटे (34) रा. वरोरा,  प्रणाली नानघाटे (18) रा. टेमूर्डा, संगीता चंद्रशेखर रगडे (38) टेमूरखेडा, सतीश गारघाटे (53) रा. भद्रावती, भोजराज बागेसर (60) रा. वरोरा, सुरज दाते(23) रा. मजरा, रिना बोरिकर (30) रा. वरोरा, रूखमाबाई पुरके (60) रा. चनई, अनिता नरेश परचाके (37) रा.  घुग्घूस, रूखमाबाई फुलसे (50) रा. कोरपना, प्राची रगडे (21) रा.  वरोरा, सरस्वती डाहुले (61) रा. वरोरा,  अवित अहमद (42) रा. घुग्घूस,  पत्रुल हसन सिध्दीकी (65) रा. घुग्घूस, किर्तीका बानो सिध्दीकी (34) घुग्घूस आदी  15 प्रवाशांचा समावेश आहे.