नेटवर्क मार्केटींगच्या व्यवसायात ‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या गुरूजीची होणार तक्रार

ऑस्टेलियन कंपनीवर गुरूजी फिदा
मंगेश पोटवार, मूल
शिक्षक पेशात राहुनही पैश्याच्या लालसेपोटी विद्यार्थ्यांना ज्ञानार्दनाचे काम कमी करायचे आणि नेटवर्क मार्केटींगच्या कामात ‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या गुरुजीची तक्रार काही सामाजिक संस्थेच्या वतिने करण्यात येणार असुन अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

मूल तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत सहा. शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम कमी करून केवळ पैश्याच्या लालसेपोटी नेटवर्कींग मार्केटिंगचे काम मोठया प्रमाणावर करीत आहे, सदर कंपनी ही ऑस्टेलियाची नामांकीत कंपनी असल्याने त्यांचे वेढ त्याशिक्षकाव्यतिरीक्त काही शिक्षकांना आणि इतर कर्मचारी वर्गाला लागले असुन तो मास्टरमाईंड शिक्षक नेटवर्क मार्केटिंगच्या धंदयात मोठया आर्थिक नफ्याचे लोभ दाखवून अनेक शिक्षकांना सामिल करून घेत आहे. मागील दिड वर्षापासुन कोरोना संक्रमणामुळे जिल्हा परिषद शाळेला सुट्टी दिली होती, याचाच फायदा घेत सदर शिक्षकांने नेटवर्क मार्केटिंगमध्ये चांगला व्यवसाय दिल्याने तो विदेशातही जाऊन आला, विदेशात जाण्यासाठी वरिष्ठाांकडुन परवानगी घेणे गरजेचे होते परंतु त्या ‘आकाश’भरारी घेणाऱ्या शिक्षकाला परवानगी मिळवुन जाणे आवश्यक वाटले नाही, यामुळेच त्यांनी परवानगी न घेताच विदेशवारी करून आला, याबाबत जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्या गुरुजीला विदेशात जाण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगीतले.

कोरोना काळात शाळेला सुट्टी दिली असतानाही मूल तालुक्यातील बऱ्याच गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेत जावुन विद्याज्ञानाचे महान कार्य करीत होते, तर काही अपवादात्मक महाभाग आपली अक्कल नेटवर्क मार्केटिंग मध्ये लावत होते अशा महाभागाच्या कृत्याचा त्रास प्रामाणिक सेवा बजाविणाऱ्या शिक्षकांना सहन करावा लागत आहे.

सदर नेटवर्क मार्केटींगच्या व्यवसायात ‘आकाश’भरारी घेणाऱ्या त्या मास्टरमाईंड गुरूजीची काही संघटनेच्या माध्यमातुन तक्रार करण्यत येणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पुढील भागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला लागले नेटवर्क मार्केटिंगचे डोहाळे