काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पंतप्रधानांबद्दल बेताल वक्तव्य

 जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले व भाजपा कार्यकर्त्यांनी दिली मूल पोलिसात तक्रार 

मूल : भंडारा जिल्ह्यातील जि. प. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ अश्या प्रकारचे वादग्रस्त विधान रविवारी साकोली येथे केले.

देशाच्या सन्माननीय पंतप्रधानाबद्दल असे घृणास्पद वक्तव्य केल्याच्या विरोधात जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले व भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला. तसेच त्याविरुद्ध पोलीस स्टेशन . मूल येथे तक्रार नोंदवली आहे.

नाना पटोले यांच्या घृणास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध करते व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविणाऱ्या व्यक्तीला असे घृणास्पद वक्तव्य शोभा देत नाही. देशाचे पंतप्रधान हे देशातील एक मोठे संविधानिक पद आहे. त्यांच्याबाबत बोलतांना अदबीने बोलायला पाहिजे. म्हणून मी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करते’ असा शब्दात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी आपले मत व्यक्त केल्या.
याप्रसंगी मूल नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी नगरसेवक प्रशांत लाडवे, चंद्रकांत आष्टनकर , चंदू नामपल्लीवार, सुरज मांदाडे, राकेश ठाकरे, प्रशांत बोबटे, रुपेश निकोडे व  भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.