वर्षेभरापासुन निस्वार्थ सेवा : शोध विचार वेध बहुउद्देशिय संस्थेचा पुढाकार
✍️ नुतन गोवर्धन, मूल : धबधब्यातुन वाहणारा पाण्याचा प्रवाह नेहमीच सुरू राहावा यासाठी मूल येथील स्वच्छता मित्रांकडुन सोमनाथ परिसराची स्वच्छता केली जात आहे, दरम्यान यावर्षी धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अखंड सुरूच असल्याने, स्वच्छतामित्रांचे भाविकांनी आभार मानले.
मूल तालुक्यातील सोमनाथ येथे भगवान महादेवाचे पुरातन मंदीर आहे, तालुक्याच्या ठिकाणाहुन केवळ 12 किमी अंतरावर सोमनाथ देवस्थान आहे, निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या याठिकाणी छोटेस मंदिर, मंदिराच्या मागील भागात डोंगर, झाडे आणि बारमाही वाहणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
जिल्हयातील आणि जिल्हयाबाहेरील पर्यटक पावसाळा आणि हिवाळयात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मोठया प्रमाणावर सोमनाथ येथील देवस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. देवस्थानापासुन अवघ्या दोन किमी अंतरावर स्व. बाबा आमटे यांचे सोमनाथ प्रकल्प आहे. त्याठिकाणीसुध्दा बाबांचे विचार घेण्यासाठी नागरीक भेट देत असतात. आपल्या जन्मभुमीची आठवण सदैव मनात ठेवुन सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गौरव शामकुळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सोमनाथ मंदिर परिसराची स्वच्छता करतात.
सोमनाथ येथील देवस्थान परिसरातील धबधब्यातुन वाहणारा पाण्याचा प्रवाहन उन्हाळयात बंद होत असल्याने, पाण्याचा प्रवाह जिवंत राहावा यासाठी संपुर्ण परिसरात आढळुन येणारे प्लॉस्टीक पिशव्या, पाणी, दारू बॉटल, वेफर्सचे पिशव्या मोठया प्रमाणावर पडुन राहात होते, सामाजिक कार्यकर्ते गौरव शामकुळे यांनी आपल्या मित्राना घेवुन आठवडयातील दर बुधवारी सोमनाथ येथे जावुन परिसराची स्वच्छता करतात, सदर स्वच्छता अभियान गेल्या वर्षीपासुन नियमीत सुरू असल्याने यावर्षी धबधब्यातुन वाहणाऱ्या पाण्यात खंड पडलेला नसल्याचे नागरीक सांगतात.
सुमीत समर्थ यांचेकडुन कचराकुंडीची मदत
गेल्या वर्षीपासुन सुरू असलेल्या यास्वच्छता अभियाना दरम्यान कचराकुंडीची खुप गरज असल्याचे लक्षात येता सामाजिक कार्यकर्ते गौरव शामकुळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आवाहन केले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी दोन कचराकुंडी भेट देवुन स्वच्छता अभियांनाला मदत केली, याअभियानाला सदर कचराकुडीमुळे खुप मोठी मदत होणार असल्याने गौरव शामकुळे यांनी सुमीत समर्थ यांचे आभार मानले.