विरोधी पक्षाला जनतेचा अल्प प्रतीसाद
मुल (प्रतिनिधी) : जिल्ह्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या नगरपंचायत निवणुकिमध्ये काँग्रेसने सावली, सिंदेवाही, कोरपना नगरपंचायत मध्ये बहुमत प्राप्त करीत गोंडपीपरी मध्ये बहुमताच्या जवळपास पोहचत निर्विवाद यश मिळविले असुन नागरिंकानी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवल्याचे दिसत आहे.
नुकताच झालेल्या जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेतृत्व केले. आज लागलेल्या निकालात जनतेनी पोभूर्ण नगरपंचायत वगळता काँग्रेस पक्षाला सावली, कोरपना, सिंदेवाही, गोंडपीपरी नगरपंचायत निवडणुकित काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे सध्यातरी पालकमंत्री विजय वडेट्टीवार पास झाल्याचे नगर पंचायत निवडणुकीवरून दिसून येते.
जिवती नगरपंचायत
एकूण जागा – १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५
————
सिंदेवाही नगर पंचायत
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १
सावली नगर पंचायत
एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३
——
कोरपना नगर पंचायत
एकूण जागा १७
घोषित निकाल- १४
काँग्रेस- ११
आघाडी-३
गोंडपिंपरी नगर पंचायत
एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२
———
पोंभुर्णा नगर पंचायत
एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१