1 महिला जागीच ठार तर दोन गंभीर जखमी
वरोरा (प्रतिनिधी) : नादुरूस्त मिनी टॅªव्हर्स दुरूस्त करून ट्रायल घेण्यासाठी निघालेल्या ट्रॅव्हर्ल्स वरील चालकाचे नियंत्रण सुटयाने एका दुचाकी वाहनाला धडक दिली, याअपघातात एक महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना वरोरा हायवे वरील एच पी पेट्रोप पंप जवळ घडली. शांताबाई शंकर गोचे वय 68 वर्षे रा. वडगांव तालुका वरोरा असे मृतक महिलेचे नांव आहे तर तुळशीराम हरी गोचे वय 52 वर्षे रा. वडगाव, राजु शंकर गोचे वय 38 वर्षे हे गंभीर जखमी आहेत.
वरोरा चिमुर मार्गाने चालणारे प्रवाशी ट्रॅव्हर्ल्स क्रं. एम एच 40 बी जी 6420 हे वाहन दुरूस्तीसाठी घाटे चौक येथील एका दुरूस्ती केंद्रात लावले होते, वाहनाची दुरूस्ती केल्यानंतर सदर वाहनचे ट्रायल घेण्यासाठी वाहन काढले असता चंद्रपूर मार्गाने येत असलेल्या दुचाकी वाहन क्रं. एम एच 32 टी 2719 ला जबर धडक दिल्याने दुचाकी वाहनावरून प्रवास करणाÚया शांताबाई शंकर गोचे वय 68 वर्षे रा. वडगांव या जागीच ठार झाल्या, तर तुळशीराम हरी गोचे वय 52 वर्षे रा. वडगाव, राजु शंकर गोचे वय 38 वर्षे हे गंभीर जखमी आहेत.
जखमीना उपचारासाठी 108 रूग्णवाहीकेने रूग्णालयात नेण्यात आले, प्राथमिक उपचार करून राजु गोचे यांना नागपूर तर तुळशिराम गोचे यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मुतक व जखमी एकाच कुटुंबातील व्यक्ती आहे, घटनास्थळाचा पोलीसांनी पंचानामा केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.