शुभमचा चंद्रपूरात आढळला मृतहेद

वढोलीत शोककळा

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : एका खाजगी कंपनीत काम करीत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील युवकाचा लालपेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरीग कॉलेजच्या संरक्षण भिंतीच्या जवळ असलेल्या एका झाडाळा गळफास घेतलेल्या अवव्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुभम पुंडलिक चुधरी वय 23 वर्षे असे मृतदेह आढळलेल्या युवकाचे नांव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा वढोली येथील शुभम पुंडलिक चुधरी हा पडोली येथील मामाच्या घरी राहुन चंद्रपूरातील एका खाजगी कंपनीमध्ये काम करीत होता, तो गेल्या 4 दिवसांपासुन बेपत्ता असल्याने पडोली पोलीस स्टेशन मध्ये शुभम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती, दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर येथील लालापेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेजच्या संरक्षणभितीला लागुन असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत शुभमचा मृतदेह आढळुन आला. शुभम आत्महत्या केला की त्याची हत्या करण्यात आली हे अजुन तरी गुलदस्त्यात आहे, पुढील तपास पोलीस करीत आहे.

आठ वर्षापुर्वी शुभमच्या वडीलानी कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली होती, आई, बहिण आणी शुभम मिळुन कुंटुब चालवित होते, बहिणीच्या लग्नानंतर शुभम कामानिमीत्य पडोली येथील मामाच्या घरी राहुन एका खाजगी कंपनीत काम करू लागला होता, दरम्यान आज शुभमचा मृतहेद आढळुन आल्याने चुधरी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.