भ्रमणध्वनीत बाय बाय स्टेटस ठेवत विद्यार्थ्यांची गळफास घेवुन आत्महत्या

खुलताबाद (प्रतिनिधी) : तालुक्यामधील ताजनापुर गावात एका महाविद्यालयीन युवकांने स्वतःच्या भ्रमणध्वनीत बाय बाय असा स्टेटस ठेवत घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. राजेश ज्ञानेश्वर काळे वय 18 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथील राजेश ज्ञानेश्वर काळे वय 18 वर्ष हा घरातील सर्व व्यक्ती कामाला गेलेले पाहुन  स्वतःच्या भ्रमणध्वनीवर बाय बाय असा स्टेटस ठेवुन आत्महत्या केली, दरम्यान राजेशच्या मित्रानी त्याचा स्टेटस बघुन राजेशचा शोघ घेतला, यावेळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. सदर युवकाने आत्महत्या का केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करीत आहेत.