केळझर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शेकडो नागरिकांनी केली तपासणी

मूल (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिस-या लाठेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण परिसरात रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात आरोग्य तपासणी करण्याच्या दुष्टीने जिंल्हा परिषद प्राथमिक शाळा केळझर, येथे नुकताच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला.

शिबिराचे उदघाटन चंद्रपूरच्या बाल रोग तज्ञ डॉ. अभिलाषा राकेश गावतुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अस्थीरोग तज्ञ व स्पाईन सर्जन डॉ. सुनील मालोजवार, प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राकेश गावतुरे, मधुमेह हृदयरोग तज्ञ डॉ. अनुप वासाडे, कान, नाक, घसा, तज्ञ डॉ. आशिष पोडे, स्त्री रोगतज्ञ डॉ. रितेश सोंडवले, शल्यचिकित्सक डॉ. रुपेश सोंडवले, जनरल फिजिशियन डॉ. राकेश वनकर, डॉ.सिराज खान, डॉ. दीपक जोगदंड, डॉ. पराग जाधव, डॉ. वैभव पडचेलवार, डॉ तिरथ उराडे, आयुर्वेद तज्ञ डॉ. राजू ताटेवार, लॅब असिस्टन प्रशांत तावाडे, सौ. सोनाली लोनबले उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात मधुमेह, बिपी, रक्त तपासणी, युरीन तपासणी व इतर दुर्धर आजारावर उपचार करून मोफत औषधी वाटप करण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना आरोग्याच्या बाबतीत जागृत राहण्याचा सल्ला दिला. शिबिरात ४५० महिला, पुरुष रूग्णाची तपासणी करण्यात आली.

आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक साईनाथ लोनबले यांनी केले तर उपस्थिताचे आभार स्वप्नील खोब्रागडे यांनी मानले.