मूल (प्रतिनिधी) : मूल-सिंदेवाही मार्गांवर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या टाटा मँजीक गाडीला अचानक आग लागल्याने वाहन जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली.
परिवहन विभागाच्या बस सेवा बंद असल्याने प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे दरम्यान मूल बस स्थानकासमोर रवि कल्लुरवार यांच्या मालकीची टाटा मँजीक क्र. MH34-D-2455 उभी असतानात्या वाहणाला अचानक शार्ट सर्किट झाल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. जळालेल्या वाहणाला विझविण्यासाठी मूल नगर पालिकेच्या अग्निशमन वाहणाला पाचारण करण्यात आले मात्र अग्निशमन वाहन मागील एक महिन्यापासून नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
मूल नगर पालिकेची अग्निशमन वाहण उपलब्ध असती तर जळालेली प्रवाशी वाहन विझविण्यास मदत झाली असती. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचून तपास करीत आहे.