कन्हाळगाव देवस्थान येथे विकास कामाला मंजुरी

जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते भूमिपूजन

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान कन्हाळगांव येथे जिल्हा परिषदेचे कडुन विकास कामाना मंजुरी मिळाली असुन सदर कामांचे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरूनुले यांचा जिल्हा परिषद क्षेत्रातील कन्हाळगांव या देवस्थानात पेवर ब्लॉक लावुन सुशोभिकरण करण्याची गरज होती, जिल्हा परिषदेच्या ‘क’ तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत 10 लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. याकामाचे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांच्या हस्ते नुकताच भुमीपुजन करून कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

यावेळी चिखलीचे उपसरपंच दुर्वास कडस्कर, ग्राम पंचायत सदस्य राकेश डोलमवार, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य उर्मिला कडस्कर, ग्राम पंचायत सदस्य पंकज कडस्कर, सुधाकर कोवे, संतोष कडस्कर, बालाजी कडस्कर, बेलघाटाचे पोलीस पाटील चंद्रकांत येरमे, सुरेश बावणे, बंडू वाकूडकर, भाष्कर वडुले, सुभाष सुरपाम, सुखदेव कडस्कर उपस्थित होते.