गोवा येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेत होणार सहभागी
मूल (प्रतिनिधी) : जि आय टोकु काई कराटे डिओ या संस्थेच्या वतिने नागपूर येथील दिव्या निर्मल धाम आश्रम यांच्या सहकार्याने नागपूर येथे प्रथम आमंत्रित कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यास्पर्धेत मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि रजत पदक पटकाविले.
मूल येथील कराटे प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी नागपूर येथे झालेल्या प्रथम आमंत्रित कराटे स्पर्धेत सहभागी झाले होते, यामध्ये वंश संदिप मोहबे याला सुवर्ण पदक, निहान वासुदेव बुरडकर याला सुवर्ण पदक तर रूद्रा अविनाश मेश्राम याला रजत पदक प्राप्त केलेला आहे. सदर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गोवा येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
सदर विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षक भिमानंद चिकाटे, रंगनाथ पेडुकर यांच्या मार्गदर्शनात कराटे प्रशिक्षण घेत आहेत. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.