बियरची शौक पुर्ण न केल्याने मित्राच्या पोटात खुपसली बियरची बाटल

पोलिसांनी केला गुन्हा दाखल : मित्र जखमी 

बल्लारपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दारूबंदी होती, मात्र शासनाने दारू सुरु करुन परत धिंगाणा सुरु झाल्याचे बल्लारपूरच्या घटनेवरून दिसून येत आहे, बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बाटली खुपसून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकातील एका बिअरबारमध्ये तिघे मित्र बिअर पिण्यासाठी बसले होते. काही बिअर पिल्यानंतर आणखी बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे नशेत असलेल्या इतर दोघांनी बिअरची बाटली त्याच्या पोटात खुपसली. या घटनेत मित्र शाहरुख पठाण हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी असलेल्या शाहरुख पठाण याला लगेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मित्र नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.