गळफास घेऊन युवकांची आत्महत्या

चंद्रपूर  (प्रतिनिधी):  आजाराला कंटाळून बाबूपेठ परिसरातील महात्मा फुले चौकात राहणाऱ्या एका युवकांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना मंगळवारी सकाळी 9. वाजता दरम्यान उघडकीस आली. रोशन गुणवन्त चौधरी वय 32 वर्षं असे आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे.

चंद्रपूर बाबुपेठ परिसरात राहणाऱ्या रोशन चौधरी वडिलांच्या ठिकाणी डब्लु सी एल येथे कार्यरत होता परंतु मागील 1 दीड वर्षांपासून तो अर्धांगवायु या आजाराने ग्रस्त होता, त्याचे औषधोपचार सुरू असून व्याधी हळूहळू नियंत्रनात येत होती. परंतू आज आजाराने त्रस्त होऊन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे