अप्पर आयुक्ताचा निर्णय
हिंगणघाट (प्रतिनिधी) : शासकीय जागेवर अतिक्रण केल्याचा ठपका ठेवत हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच सविता महेश भोयर यांना नागपूर विभागाचे अपर आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. अपर आयुक्तांच्या या निर्णयामुळे भोयर यांच्या अडचणीत भर पडली आहे.
8 सदस्य संख्या असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ग्राम पंचायतच्या सरपच पदाची थेट निवडणुक पार पडली होती. यानिवडणुकीत मतदारांनी सविता भोयर यांना निवडुन दिले होते, सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यात सरपंच सविता भोयर यांचे सासरे नामदेव भोयर यांनी राहत्या घरासमोर २० बाय १० फुट जागेवर टिनाचे शेड उभे करून शासकीय जागा काबीज केली होती. त्यात त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडून दिलासा मिळाला होता, पण संजय गिरी यांनी याच निकालाला आवाहन देणारी याचिका अपर आयुक्तांकडे दाखल केली.
सदर प्रकरण संजय गिरीविरुद्ध गैरअपिलार्थी सविता महेश भोयर, गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, सचिव ग्राम पंचायत. गाडेगाव, जिल्हाधिकारी वर्धा असे राहिले. याप्रकरणी युक्तिवाद करताना विविध पुरावे सादर करून बाजू मांडण्यात आली. शिवाय गैरअपिलार्थी एक यांनी शेत सर्व्हे क्र. ११३ जागा 2.28 आराजी मौजा गाडेगाव येथील शेताला लागून असलेल्या सर्व्हे क्र. ७ फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण केले ते मोजणी अंति निष्पण झाले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन अपर आयुक्तांनी गाडेगाव येथील सरपंच सविता भोयर यांना अपात्र घोषित केले. विशेष म्हणजे सद्यस्थितीत गावातील उपसरपंच आणि सरपंच हे दोन्ही पद रिक्त आहेत. उपसरपंच हे अतिक्रमणामध्ये अपात्र झाले आहेत, सदर निर्णयामुळे गावात खळबळ माजली आहे.








