विहीरीत आढळला बिबटयाचा मृत्तदेह

आमटे फार्म परिसरातील घटना

मूल (प्रतिनिधी) : जंगलभ्रमती करीत असलेल्या एका बिबटयाचा तोंडी नसलेल्या विहीरीत पडलेल्या स्थितीत मृत्तदेह आढळून आला आहे, सदर घटना सोमनाथ येथील आमटेफार्म परिसरातील आहे.

मूल तालुक्यतील बफर क्षेत्र असलेल्या सोमनाथ आमटे फार्म परिसराला लागुन मोठे जंगल आहे, यापरिसरात मोठया प्रमाणात वन्यप्राणी फिरत असतात, सोमनाथ आमटेफार्म परिसरातील एका खाजगी शेतात बिबट फिरत असताना तोंडी नसलेल्या विहीरीत पडल्याची घटना 1 ते 2 दिवसाआधी घडली,  सदर बिबट हा नर जातीचा असून सुमारे 3 वर्षाचा असावा असा अंदाज वनविभागाबी वर्तविला आहे.

घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर, क्षेत्र सहा. पाकेवार व वनकर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. बिबट्यावर चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here