पत्रकार संघाची वेगवेगळ्या जिल्हात आरोग्य जनजागृती

विदर्भ अध्यक्षांचा वाढदिवस थाटात संपन्न

चंद़पूर (प्रतिनिधी) : राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा. महेश पानसे यांचा वाढदिवस आरोग्य
जनजागृती दिन म्हणून संपुर्ण विदर्भात थाटात साजरा करण्यात आला.

जिल्हातील वेगवेगळया तालुक्यांमध्ये राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांचा वाढदिवस रूग्णांना शाल, फळे व प्ऱाथमिक सुविधा पुरवून व आरोग्य जनजागृती करून राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी अभिष्टचिंतन केले. चिमूर तालुक्यात विभागीय उपाध्यक्ष प़दिप रामटेके, तालुका अध्यक्ष केवलसिंह जूनी यांनी पुढाकार घेतला. नागभिड तालुक्यात नवेगाव पांडव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. चाकोले, सरपंचा सौ. अॅड. शर्मिला रामटेके यांचे मार्गदर्शनात
व उपस्थितीत केक कापून,जनजागृती व फळेवाटप करून तालुका अध्यक्ष सुधाकर श्रीरामे यांचे पुढाकारात वाढदिवस साजरा करण्यात आला. तळोधी येथे शासकिय रुगणालयात पत्रकार संघ अध्यक्ष संजय अगळे व पदाधिकारी यांनी जनजागृती पर कायंक़म साजरा केला. मूल येथे प्रा. .महेश पानसे यांचे उपस्थितीत उपजिल्हा रुगणालयात रूग्ण सेवा देऊन सर्व तालुका संघाने केक कापून अभिष्टचिंतन केले. बल्लारपूर तालूका संघाने तालुका अध्यक्ष दोतपल्ली, मुन्ना खेडकर यांचे मार्गदर्शनात जनजागृती व पळे, बिस्किट वाटप करण्यात आले. गोंडपिपरी येथे तालुका अध्यक्ष वेदांत मेहरकुले, वरोरा येथे तालुका अध्यक्ष बालूभाऊ भोयर, ब़म्हपूरी येथे तालुकाध्यक्ष डॉ. प्रा. रवी रणदिवे, सचिव नंदु गुडडेवार यांचे नेतृत्वात मोठया संख्येत मास्क वितरण करण्यात आले.

नागपूर शहरात गरजूना ब्लॅकेट वाटप व आरोग्य विषयक नियमावली समजावून वाढदिवस साजरा करण्यात आला. वर्धा जिल्हयात रूगणांना शाल व आवश्यक वस्तू वाटप करून व माहिती देवून प्रा. महेश पानसे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे, भंडारा जिल्हाध्यक्ष सदाशिव ढेंगे, वर्धा जिल्हाध्यक्ष प़मोद पानबुडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्ऱदिप शेंडे यांनी
चंद़पूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे यांनी विदर्भ अध्यक्ष प़ा. महेश पानसे यांचे वाढदिवस आरोग्य जनजागृती दिन म्हणून साजरा करण्याकरीता पुढाकार घेतला होता.