राष्ट्रीय पैरा ऑलम्पिक पंच परीक्षेत चंद्रपूरच्या तीन महिलांनी मारली बाजी

देशभरातील १०० हून अधिक पात्र परीक्षार्थीनी सहभाग नोंदवला

अतुल कोल्हे भद्रावती – भारतीय पैरा ऑलम्पिक संघटने तर्फे आयोजित अखिल भारतीय पैरा ऑलंपिक तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा दि. ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी बेंगलुरु येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेला देशभरातील १०० हून अधिक पात्र परीक्षार्थीनी सहभाग नोंदवला होता.

सदर परीक्षेकरिता चंद्रपूर जिल्हा तर्फे विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता बांबोडे, शासकीय आदिवासी आश्रम शाळा पाटण येथील क्रीडा मार्गदर्शिका कुमारी वर्षा कोयचाडे तसेच चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सदस्य कुमारी पूर्वा खेरकर यांनी देखील सदर परीक्षेमध्ये सहभाग घेतला असून तिघेही राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी व पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.

तिघींच्या प्राविण्यबद्दल यांचे क्रीडा जगतात सर्वत्र कौतुक होत आहे. यांच्या यशाबद्दल प्राचार्य एन. जी. उमाटे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध हौशी क्रीडा संघटक डॉ. दिलीप जयस्वाल, डॉ. राकेश तिवारी, डॉ. बी. प्रेमचंद, श्री रसिकलाल वारकरी, डॉ अनिता लोखंडे,श्री गजानन जिवतोडे, श्री सुरेश अडपेवार, श्री राजेश मत्ते, श्री संतोष निंबाळकर, श्री चंद्रशेखर कुंभारे, श्री दुर्गराज रामटेके, डॉ. संघपाल नारनवरे, डॉ. अनीस खान श्री तानाजी बायस्कर, श्री किशोर चिंचोलकर, श्री हरिश्चंद्र विरुटकर, श्री उमेश कडू, श्री शिवाजी नागरे, श्री बाळू कातकर, श्री मयूर खेरकर, श्री विकी पेटकर तसेच समस्त क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहे.