भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्रात कोवीड लस खराब झाल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा

कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन

प्रमोद मेश्राम चिमूर :-भीसी प्राथमिक आरोग्य केंद्रातिल कोविड लस खराब झाल्या प्रकरणी दोषिवर कार्यवाही करन्यासन्दरभात जिल्ह्या आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना तालुका वैधकीय अधिकारी चिमुर यांचे मार्फ़त शिवसेना चीमूर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले,

भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्रात १२ ऑक्टोंबर २०२१ ला कर्मचाऱ्यांच्या चूकीमुळे कोवीड १९ चे २७०० डोज ( लस ) खराब झाले होते. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणात येथील वैद्यकीय अधीकारी डॉ. प्रियंका कष्टी व आरोग्य सेवीका शिला कराडे यांची बदली सुध्दा करण्यात आली. परंतु पांच महीन्यांचा कालावधी होऊनसुध्दा आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची फक्त बदली करून गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. या गंभीर प्रकणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून खराब झालेल्या लसीची पूर्ण रक्कम वसुल करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी पत्रद्वारे देण्यात आला,

यावेळी शिवसेना चिमुर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते,