महाराष्ट्राच्या जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी

भाजप कार्यालयासमोर काँग्रेसचे निषेध आंदोलन

मुल प्रतिनिधी:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना देशातील कोरोना वाढीला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असे वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फ़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मूल तालुका तर्फे भाजप कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

निषेध आंदोलनादरम्यान ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बंडू  गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे व त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे देशात कोरोना पसरला जर तात्काळ केंद्र सरकारने विदेशी प्रवास यात्रा बंद केली असती तर देशावर कोरोना सारखा महाभयंकर रोग पसरला नसता असे मत व्यक्त करीत  मोदी सरकारचा निषेध केला.

आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, बाजार समिती संचालक राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, डॉ. पद्माकर लेनगुरे, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, गुरु गुरनुले,  युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, नगर सेवक विनोद कामडे, आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, माजी सरपंच सुमित आरेकर, हसन वाढई, ताडालाचे माजी उपसरपंच राहुल मुरकुटे,  विवेक मुत्यालवार, सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन,  मनोज ठाकरे, संतोष गावतुरे, अनवर शेख, गणेश रणदिवे, लोकनाथ नर्मलवार, धनराज रामटेके , महिला कांग्रेसच्या संगीता भोयर,  माधुरी मंगर, वासुदेव उमरगुंडावार आणि  पदाधिकारी,शहर,युवक,महिला काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचेसह  जेष्ठ, व युवक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.