बांबू कलावंत मीनाक्षी वाळके यांना तेजस्विनी पुरस्कार घोषीत

महिलादिनी होणार पुरस्काराचे वितरण

चंद्रपूर, (प्रतिनिधी) :  येथील भारतीय स्त्री शक्ती’  कडून दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यंदाचा हा पुरस्कार बांबू कलावंत आणि उद्योजक मीनाक्षी मुकेश वाळके यांना घोषित झाला आहे. रोख रक्कम, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार दिला जातो. महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 13 मार्चला तुकूमच्या न्यू इंडिया कॉन्व्हेन्ट सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि स्त्री शक्तीच्या 22 वर्षांपासून प्रकाशित होणार्‍या अग्निशिखा या हस्तलिखित स्मरणिकेचे प्रकाशनसुध्दा करण्यात येणार असल्याची माहिती सविता भट आणि नंदिनी देवईकर यांनी दिली आहे.

26 वा तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी मीनाक्षी मुकेश वाळके या अपारंपारिक बांबू कलावंत असून, त्यांनी या क्षेत्राला 5 नव्या ‘डिजाइन’ दिल्या आहेत. पहिले बांबू क्यूआर कोड स्कॅनरचे डिजाइन त्यांनी तयार केले आहे हे विशेष.