चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम
अतुल कोल्हे भद्रावती :
जगात मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी आरोग्याची समस्या न सुटणारी असते कारण आजच्या काळात नवीन-नवीन आरोग्य विषयक समस्या निर्माण होतांना आपल्याला दिसते, आज कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान मांडल्याचे दिसून येते. तसेच शेतकरी व वन्यजीव प्राणी संघर्ष मोठया प्रमाणात पेटल्याचे ग्रामीण भागात पाहायला मिळते. शेतकऱ्यांना वन्यजीवांचा खूप त्रास सहन करावा लागतो तसेच प्रसंगी आपला जीव सुद्धा गमवावा लागतो.
भद्रावती तालुक्यातील मांगली रै या गावातील महिला इंदिरा शत्रुघ्न खापणे या महिलेला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले घरची परिस्थिती जेमतेम त्यामुळे इलाज करणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी काय करावे या विवंचनेत असतांना जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांचा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत धनादेश तयार करून घेतला. तसेच सुधाकर खुजे यांचा बैल वाघाने मारला व मीरा कोटनाके यांचे पती मधुकर कोटनाके यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांचेही धनादेश रवींद्र शिंदे यांनी स्वतः तयार करून नुकतेच दि.(8 फेब्रुवारी) ला त्यांना त्यांच्या गावात जाऊन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती, भद्रावतीच्या माजी सभापती विद्याताई कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सूरज चौधरी, सतीश कांबळे, मांगली येथील सरपंच धनराज पायघन, मंगेश ठेंगणे, उपसरपंच झिलपे ताई, सदस्य भीमराव वानखेडे, भाविक गेडाम,निमकर ताई तसेच समस्त गावकरी तंटामुक्त समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र शिंदे यांनी ट्रस्ट मार्फत व बँकेच्या वतीने चालत असलेल्या विविध योजनेची माहिती दिली तसेच भविष्यात ही अनेक योजना ट्रस्ट मार्फत चालविल्या जाईल त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असावं त्यांनी यावेळी आवाहन केले.