लता लाकडे होणार सावलीच्या नगराध्यक्ष

नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज

सावली (प्रतिनिधी) : सावली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी कांग्रेस कडुन लता लाकडे  यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याने 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध होणार आहे.

सतरा नगरसेवक असलेल्या सावली नगरपंचायत मध्ये कांग्रेस चे १४ नगरसेवक तर भाजपाचे 3 नगरसेवक निवडुण आले आहे, शुक्रवारी काँग्रेस कडून लता लाकडे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने  होणारी नगराध्यक्ष पदाची निवडणुक अविरोध होणार आहे.

17 फेब्रुवारी रोजी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यापदासाठी काँग्रेस कडून वेगवेगळी नावे समोर येत आहे. यावेळी निवडणुक निर्णय अधीकारी म्हणून  महादेव खेडेकर व मनीषा वझाडे उपस्थित होते.