धानविक्रीची रक्कम न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी

स्नेहल तावाडे, सावली
कर्ज आणि उसवारी मागीतलेले पैसे परत करण्यासाठी सोसायटी आणि फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आली मात्र दिड महिण्याचा कालावधी लोटुनही अजुन पर्यंत धान विक्रीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले असुन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, यामुळे विक्री केलेल्या धानाचे तात्काळ पैसे देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सावली तालुक्यातील सोसायटी आणि फेडरेशनच्या माध्यमातुन आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली मात्र दीड महिण्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने पैसे जमा केली नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील शेतकऱ्याना शेती व्यतिरीक्त कोणताही रोजगार नाही, शेतीच्या पिकातुन निघणाऱ्या उत्पन्नातुन वर्षभराचे नियोजन केले जाते. मात्र शासनाने शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे देण्यास विलंब करीत असल्याने शेतकऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अवकाळी पावसाने यावर्षी धानाचे चुरने उशिरा झाले त्यामुळे आधारभूत धान केंद्रावर  खरेदी सुरु आहे मात्र काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात धान विक्री केली होती, दीड महिन्याचा कालावधी लोटुन गेला मात्र अजुन शेतकऱ्यांना धानाचे पैसेे मिळाले नाही यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे, अवकाळी पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, यामुळे शासनाने शेतकऱ्याना बोनसची रक्कमही तात्काळ दयावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

धानविक्रीची रक्कम तात्काळ मिळावे यासाठी प्रयत्न करू: राजेश सिध्दम
धानविक्री करूनही धानाचे पैसे देण्यास विलंब होत असल्यामुळे पालकमंत्री यांना याबाबत माहिती दिली आहे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान व विमाची रक्कम तात्काळ देण्यासाठी प्रयत्न करून अशी प्रतिक्रीया कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम यांनी दिली.