ग्राम विकास अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी !  

मुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल !

धनराज रामटेके मुल :- मूल तालुक्यातील चिरोली ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री व्ही.एम.यारेवार यांना त्याच गावातील इसमाकडून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सबंधित व्यक्तीविरोधात मुल पोलीस स्टेंशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चिरोली ग्रामपंचायत मध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ला ठीक 12.00 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेला अध्यक्ष म्हणून श्री. भक्तदास कुंभारे होते सभेचे कोरम पूर्ण झाल्याने सभा सुरू करण्यात आले व सभा झाल्या नंतर अध्यक्षाच्या परवानगीने सभा समाप्त झाल्याचे कळविण्यात आले सभा आटोपल्यावर गावातील प्रशांत मुरारी रामटेके यांनी ग्रामविकास अधिकारी श्री. व्ही. एम. यारेवार यांच्यासोबत निरर्थक मुद्यांना घेऊन वादावादी करण्याचा प्रयत्न करीत “तू गावात कसा फिरते तर बघतो, तू जिथे दिसशील तिथे तुला मारतो” आता तू सभागृहाच्या बाहेर निघ इथेच तुला मारतो म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे चिरोली ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री. व्ही. एम. यारेवार सदर घटनाक्रमाणे व्यथित असून शारीरिक इजा सदर इसमाकडून होण्याची शक्यता वर्तवत  पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून सदर व्यक्तिविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. सदर वृत्त लिहिस्तोवर अजून कारवाही  झालेली नव्हती.