ग्रामविकास अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिलेल्या घटनेचा ग्रामसेवक संघटनेकडून जाहीर निषेध

पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल

चंद्रपूर प्रतिनिधी:- मुल तालुक्यातील चिरोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. व्ही. एम. यारेवार यांना त्याच गावातील एका इसमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने व शासकीय कामात अडथळा आणल्याने सदर घटनेचा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हाभरात पंचायत समिती समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

ग्रामपंचायत चिरोली येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ला ठीक १२.०० वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले सदर सभा श्री. भक्तदास कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेचे विषय पूर्ण झाल्याने अध्यक्षाच्या परवानगीने सभा समाप्त झाल्याचे ग्राम विकास अधिकारी श्री. व्ही. एम. यारेवार यांनी उपस्थित सर्व नागरिकांना सांगितले त्याच वेळी उपस्थित श्री. प्रशांत मुरारी रामटेके यांनी निरर्थक मुद्द्यांना घेऊन अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून ग्रामविकास अधिकारी श्री. व्ही.एम. यारेवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

ग्राम विकास अधिकारी नागरिकांना ग्रामसभेचे कामकाज समजाऊन सांगत असताना श्री. प्रशांत रामटेके यांनी गदारोळ निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने  व्यथित झालेल्या श्री. व्ही. एम. यारेवार यांनी मुल पोलीस स्टेशन मध्ये श्री. प्रशांत रामटेके विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत तक्रार दाखल केली परंतु पोलीस स्टेशन मुल चे अधिकारी सबंधित व्यक्ती विरोधात कुठलीही कारवाही न करता एन.सी. पोच दिल्याने व्यथीत होऊन आज पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे शासकीय कामात अडथळा आणने आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करून सबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केलेली आहे.

वृत लीहीस्तोवर अजूनपर्यंत कुठलीही कारवाही झालेली नसून संबधित व्यक्तीविरोधात कोणती कारवाही होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.