वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मुल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील घटना

मूल प्रतिनिधि:- मुल तालुक्यातील मौजा कोसंबी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

कोसंबी येथील ग्यानीबाई वासुदेव मोहूर्ले वय अंदाजे 60 वर्षे स्वतःच्या मालकीच्या शेतात शेतीचे काम करीत असताना वाघाने झडप घेऊन महिलेला जीवानिशी ठार केले असून सदर घटना अंदाजे 4.30 वाजे दरम्यानची असल्याचे कळते.

सदर घटनेची माहिती मिळताच  मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. सुशांतसिह राजपूत, ववनविभागाचे अधिकारी अधिक तपास करीत आहे.