गोंडपिपरि शहरात शिवजन्मोत्सवांचा आनंद

महाराजांना टेकला माथा :नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

गोंडपिपरी प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर साजरा केला जातो.शिवाजी महाराजांच्या जयघोषाने उत्सव सुरवात करण्यात आला.यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रकाश टाकण्यात आला.सोबतच नवनिर्वाचित नगरसेवकांचा ,अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

नगरपंचायत उपाध्यक्ष सारिका मडावी व सर्व नगरसेवकांच्या हस्ते विधिवत शिवपूजन करण्यात आले.नागरिकांना मसाला भात वितरित करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक सुनील संकुलवार, नअगर सेवक ,अनिल झाडे,, सुरेश चिलनकर,वनिता देवगडे,चेतन गौर,मनीषा मडावी,शारदा गरपल्लीवार,अश्विनी तोडासे,मनीषा दुर्योधन यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे,तालुका प्रमुख सुरज माडुरवार,शैलेश बैस,अशपाक कुरेशी,निलेश संगमवार,माजी नगरसेवक राकेश पुन,विवेक राणा,तुकाराम सातपुते,बालू झाडे,रमेश नायडू,बळवंत भोयर,बब्बू पठाण,राजू देवगडे,खेमचंद गरपल्लीवार,संदिप पौरकार,रुपेश कोहपरे,युवराज बांबोडे, यादव झाडे,नाना येलेवार,राजू झाडे, नितीन मेश्राम सरपंच तरुण उमरे,रज्जीक कुरेशी ,गुरुदेव बामनवाडे यांची उपस्थिती होती