राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्तुत्य उपक्रम
मूल (प्रतिनिधी) : काम करीत असतानाही अनेक मजुर कामगाराना श्रमिक कार्ड नसल्याने सुखसुविधेपासुन वंचित राहावे लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल शहर व ग्रामिण च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमीत्ताने पक्ष कार्यालयात कामगार बांधवाना श्रमिक कार्डाचे ऑनलाईन नोंदणी व लॅमीनेशन करून वितरीत करण्यात आले.
यावेळी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ, शहराध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महासचिव ज्ञानेश्वर वाघमारे , जेष्ठ नेते निपचंद शेरकी, महिला तालुकाध्यक्ष नीताताई गेडाम, प्रा. प्रभाकर धोटे, विनोद मानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर उपक्रम 19 फेब्रुवारी पासुन 25 फेब्रुवारी पर्यंत दुपारी 2 ते 8 वाजेपर्यत सप्ताह राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा कामगार बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी केले
कार्यक्रमाचे संचालन महेश जेंगठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाग्यश्री तागडे यांनी मानले, सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. किसन वासाडे, युवकचे तालुकाध्यक्ष समीर अल्लुरवार, नंदू बारस्कर , ज्ञानेश्वर वाघमारे ,प्रा प्रभाकर धोटे, दुशांत महाडोळे, हेमंतजी सुपणार, प्रदीप देशमुख, सतीश गुरनुले, साईनाथ गुंडोजवार, निकेश भडके ,संदीप तेलंग, अविनाश कोल्हे, संदीप धारने, बालाजी लेनगुरे , विनोद गुज्जनवार, किशोर पेटकुले मारोती रोहिने यांनी अथक परिश्रम घेतले.