श्री संताजी अखिल तेली समाज संघटन च्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रवीण कावरे यांची नियुक्ती

चिमूर  प्रमोद मेश्राम :- चंद्रपूर जिल्ह्यात तेली समाज संघटन वाढवून समाज जागृती करण्यासाठी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत यांनी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रवीण कावरे यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रवीण नारायणराव कावरे यांचा चिमूर विधानसभा क्षेत्रातील तेली समाज बांधवांशी दांडगा संपर्क असून ते सातत्याने समाजाच्या चळवळीत सहभागी राहत असतात. त्यामुळे श्री संताजी अखिल तेली समाज संघटना संस्थापक अनिल बजाईत यांनी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रवीण कावरे यांची नियुक्ती केली. संघटनेचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष आनंदराव जुमडे यांनी हार्दिक अभिनन्दन केले

प्रवीण कावरे यांच्या नियुक्ती बद्दल यांनी शुभेच्छा देत निखिल भूते , प्रफुल बावनकर, पंकज गायधनी, शुभम साटोने,शंकर कावरे, सचिन गायधनी, रोशन एरणे ,प्रीतम सटोने, मयूर देशमुख, मनीषा कावरे,मंदाताई बबुलकर आदी समाज बांधवांनी अभिनंदन केले.